पोलीस मित्र ही काही नवीन संकल्पना नाही. परंतु गेल्या काही दिवसांमध्ये गटाने पोलिसांवर हल्ले होत आहेत. त्यामुळे यावर चर्चा व कृती करण्याची गरज भासत आहे. कारणे काही का असेनात अशा प्रकारचे हल्ले चुकीचेच आहे. आपल्या महाराष्ट्राची ही मुळीच संस्कृती नाही.
झुंडशाही हा उत्तर भारतातील प्रकार आहे. एक दहा वीस जण मिळून एखाद्याला इतकी अमानवीय अन क्रूर मारहाण करतात की पाहणाऱ्याला देखील सहन न होवो. आता असेच काहीसे प्रकार गेल्या काही काळात महाराष्ट्रात अन तेही पोलिसांवर सुरु झाले आहेत.
टाळेबंदीचा मी विरोधक आहे. ट्विटरवर मराठीचा प्रथम वापर व्हावा यासाठी मी शासनाच्या (त्यात पोलीसांची खाती देखील येतात) तक्रार व प्रतिक्रियांद्वारे पाठपुरावा करतो! यथेच्छ टीका देखील करतो. पण पोलिसांवर हल्ले कोणीही मान्य करणार नाही. मराठी भाषिक तर स्वतःच्या पोलिसांवर असे हल्ले पाहिल्यावर खवळल्याशिवाय राहणार नाही.
२०१२ साली आझाद मैदानात रझाकार मुसलमानांनी दंगल घडवली. पोलिसांना वेचून मारहाण करण्यात आली. शेकडोंच्या जमावाने महिला पोलिसांवर देखील विनयभंग केले. पत्रकारांच्या महागड्या गाड्या जाळल्या गेल्या. २०१६ साली भिवंडीत मुसलमानांनी दोन पोलिसांना पोलीस चौकीत जिवंत जाळलं!
गेल्या वर्षभरात हे प्रकार पुन्हा सुरु झाले असून टाळेबंदीचा राग पोलिसांवर उफाळून येत आहे असे कदाचित वाटेल. पण गटागटाने हल्ले हे कसे मान्य केले जाऊ शकते? गेल्या मार्च महिन्यात नांदेडमध्ये शीख समाजाने तलवारी घेऊन पोलिसांवर हल्ले केले. त्यात दहा पोलीस जखमी झाले. टाळेबंदीच्या काळात वैयक्तिक हल्ल्यांची संख्या हजारात आहेत. आजची संगमनेरातील पोलिसांवर मुसलमानांनी केलेला हल्ला सहन करण्यापलीकडे आहे!
हे सगळं पुन्हा सांगण्यामागे माझा स्वच्छ अन स्पष्ट हेतू आहे. मराठी भाषिकांना आपल्या पोलिसांचे संरक्षण करण्याची वेळ आलेली आहे. महाराष्ट्र पोलिसांवर हल्ला म्हणजे महाराष्ट्रावर हल्ला! आज ते पोलिसांवर हल्ले करीत आहेत. उद्या आपल्या घरावर हल्ले करणार नाहीत याची शाश्वती काय? यासाठी माझ्या मते, प्रत्येक मराठी भाषिकांनी स्वतः शारीरिकरीत्या मजबूत व्हावेच पण एका भागात किमान १५-२० पोलीस मित्रांचे गट उभे करावेत.
जेंव्हा पोलिसांवर हल्ला होतो त्यावेळी त्याच्या मदतीला किमान जाता यायला हवे. जेणेकरून आपण आपल्या महाराष्ट्र पोलिसांच्या मानसिक खच्चीकरण थांबेल. राजकारण्यांच्या आशेवर राहिलोत तर भविष्यात ह्याहून भयानक परिस्थिती निर्माण झाली तर आपल्याही पुढील पिढ्यांना तो त्रास भोगावा लागेल!
महाराष्ट्रात मराठीचा आग्रह कशासाठी? देश एक आहे तर सगळ्यांनीच हिंदी भाषा स्वीकारली तर काय हरकत आहे? असे एक ना अनेक महनीय विचार आपल्याला ऐकायला मिळतात. प्रथमदर्शी हे विचार पटण्याजोगे आहेत.
पण मग प्रश्न असा निर्माण होतो की भारतीय राज्यघटनेत हिंदी अन इंग्रजीचा केवळ सांघिक सरकारी कार्यालयांपुरताच वापर करावा असा उल्लेख का केला असेल? का भाषावार प्रांतरचना केली? का देशातील प्रत्येक राज्याची भाषा ही देशाची भाषा मानली गेली?
भारताच्या राज्यघटनेत अनुच्छेद ३४७
चला या सर्व प्रश्नाची उत्तरे पाहुयात! पहिला प्रश्न, महाराष्ट्रात मराठीचा आग्रह कशासाठी? तर विषय असा आहे, भारताच्या राज्यघटनेत अनुच्छेद ‘३४७ अ’ नुसार राष्ट्रपतीला एखाद्या राज्यातील लक्षणीय प्रमाणातील लोकांकडून बोलल्या जाणा-या कोणत्याही भाषेला अधिकृतरीत्या राजभाषा म्हणून मान्यता देण्याची तरतूद आहे. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर राजभाषा मराठीचा शासन व्यवहारात वापर करण्याबाबतचे धोरण राबविण्यासाठी शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग,क्रमांक ओएफएल-११५९ बी दिनांक ६ जुलै १९६० अन्वये भाषा संचालनालयाची स्थापना करण्यात आली.
त्यामुळे महाराष्ट्रात मराठीच्या आग्रहाला कायद्याची कवचकुंडले आहेत. असेही महाराष्ट्राच्या गेल्या दोन हजार वर्षांच्या इतिहासात ह्या भूमीसाठी अन देशाच्या रक्षणासाठी ह्या भूमीतून लाखो वीर धारातीर्थी पडलेले आहेत! त्यातील एकही अमराठी भाषिक नाही. मग त्या भूमीवर तिथल्या लोकांच्या भाषेला नाकारणे असेही योग्य ठरणार नाही.
चला दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया, देश एक आहे तर सगळ्यांनीच हिंदी भाषा स्वीकारली तर काय हरकत आहे? तर मित्रांनो, देश एकच आहे यात कुणाचीही शंका नाही. परंतु हा जरी एक देश असला तरी तो खंडप्राय आहे. इतका महाकाय आहे की, एका भागातील फळे दुसऱ्या भागात येत नाहीत. अन दुसऱ्या भागातील पहिल्या! अन चुकून आलंच तर त्याला फळ येणे शक्य नाही. उदाहरण चुकीचं वाटल्यास सफरचंद महाराष्ट्रात अन आंबा काश्मिरात लावण्याचा यत्न करून पाहावा.
मग फळांमध्ये इतकं वैविध्य आहे तर इतर गोष्टींमध्ये नसेल का? मग सगळ्यांनाच एकाच भाषेत व्यवहार करण्याचा अट्टाहास का? मुळात हा खंडप्राय देश जगातील सर्वाधिक भाषांचे उगमस्थान आहे! हजारो भाषा इथं दैनंदिन जीवनात बोलल्या जातात! मुळात हे वैविध्य आपली ताकद आहे! हीच आपली संस्कृती आहे. सगळ्यांच्या मतांना आपण समसमान मानतो! मग विषय देवांचा असो वा धार्मिक आचरणाचा वा भाषेचा! हाच समजूतदारपणा ह्या देशाचे अखंडत्व अबाधित ठेवतो.
एक देश अन एक भाषा/झेंडा/गीत/काहीही ही पंधराव्या शतकातील युरोपियन संकल्पना! त्यापायी त्यांनी आपली शहर अन जिल्हे मोठी म्हणावी इतकी लहान राष्ट्रे निर्माण केली. अन त्यामुळे निर्माण झालेली असुरक्षिततेच्या भावनेने पुन्हा युरोपियन राष्ट्रांना एका संघात राहणे बाध्य झाले. मग अशी पाश्च्यात्य अन अपयशी संकल्पना आपण का स्वीकारावी! बर देश झाल्यावर एक भाषेचा यत्न पाकिस्तानने करून पाहिला! त्याचे दोन शकले झाली. देश ह्या भावनेने राहणारा समाज एक होऊ शकतो! भाषेने नव्हे!
बाकी कायद्याच्या भाषेत सांगायचे झाल्यास, भारतीय राज्यघटनेने भारत हा एक देश असून राज्यांचा तो संघ आहे असे स्पष्ट केलेले आहे. इथं कुणा एका माणसाचे वा भाषेची हुकूमशाही चालणार नाही!
भारत हा एक देश असून राज्यांचा तो संघ आहे
भारताने सांघिक राज्यपद्धती स्वीकारलेली आहे. आपण जरी एक देश असलो तर शासनाच्या दृष्टीने हा एक संघ आहे. संघाचा प्रमुख म्हणून सांघिक सरकार समन्वय साधेल. यापेक्षा जास्त महत्व नाही. सांगण्याचे तात्पर्य इतकेच की महाराष्ट्रात मराठीचा आग्रह म्हणजे कायद्याचा आग्रह आहे. व इथं मराठी नाकारणे वा टाळणे हा कायद्याचा व पर्यायाने भारतीय राज्यघटनेचा अवमान आहे! सोप्या भाषेत भारत देशाला दिलेलं ते आव्हान ठरेल.
महाराष्ट्राचा इतिहास हा जितका वैभवशाली आहे तितकाच तो अंधारातही आहे! शालेय शिक्षणात आपल्याला हा इतिहास शिकवला तर महाराष्ट्राचे भविष्य उज्वल आहे!
इतिहासाचे मुख्य तीन भागात विभागणी होते. एक ज्ञान नाही असा इतिहास. एक माहिती आहे पण त्याचे फारसे उपलब्ध नाही. अन एक भाग ज्याची लिखित साधने उपलब्ध आहे. पहिल्या भागाला प्राचीन! दुसऱ्या भागाला मध्ययुगीन अन तिसऱ्या भागाला आधुनिक संबोधतो.
महाराष्ट्राच्या इतिहासाचा विचार केला तर साधारण एकूण ज्ञात दोन हजार वर्षांचा इतिहास आहे! पूर्वी महाराष्ट्राला रठ्ठ, महारठ्ठ, अश्मक वगैरे नावे होती! साधारण इसवीसनाच्या सुरवातीचा इतिहास पहिला तर संपूर्ण दक्षिण भारतावर राज्य असलेले मावळचे सातवाहनांना दक्षिणाधिपती म्हटले जायचे! हे तेच वीर आहेत ज्यांच्यामुळे शालिवाहन शकाची कालगणना मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाली.
सातवाहन
तत्कालीन इराण, अफगाणीस्थातून आजच्या पाकिस्तानात उदयास आलेल्या शक नावाच्या बलशाली जमातीने भारतात दिग्विजय करत महाराष्ट्रावर चाल केली! अन आताच्या पंढरपूर भागात ती लाखोंच्या सेनेसोबत पराक्रमी सातवाहनांशी ते लढले. अन तो दिवस म्हणजे शालिवाहन शके सुरु झाले! त्याच विजयाचे प्रतीक म्हणजे मराठी संस्कृतीचे नववर्ष अर्थात गुढीपाडवा!!
महाराष्ट्र हा मुळातच देशाचा अनभिषिक्त सम्राट! रक्षणकर्ता अन राष्ट्रपती! रठ्ठ या संस्कृत शब्दाचा अर्थ मुळी मार देणारा असा होतो. आता महारठ्ठचा अर्थ तुम्ही लावलाच! दंड देण्याचा अधिकार राजाला असतो या अर्थाने महाराष्ट्र हा देशाचा मुख्य अन रक्षणकर्ता होतो.
महाराष्ट्र इसवीसनाच्या दुसऱ्या शतकात आंतरराष्ट्रीय व्यापार करीत होता. याचे पुरावे आजही उपलब्ध आहेत! हे यासाठी सांगतो कारण काही भेळपुरी अन पाणीपुरीच्या दुकानांना विकास म्हणत असतात! देशातील गुप्त साम्राज्यातही गुप्तांनी महाराष्ट्राशी स्नेहाचे संबंध राखले व राजकीय डावपेचांनी महाराष्ट्राच्या तत्कालीन बलदंड वाकाटकांच्या साम्राज्याला आपल्यावर चाल करू दिली नाही!
तेराव्या शतकाच्या अखेरीस देवगिरीच्या यादवांचा पराभव पाताळयंत्री अल्लाउद्दीन खिल्जीने करून हा अजेय भूभाग पहिल्यांदा काबीज केला! लक्षात घ्या देशाच्या दीड हजार वर्षांच्या गुलामीच्या काळापैकी महाराष्ट्र केवळ ४५० वर्षे गुलामीत होता!
पुढील साडे तीनशे वर्षे महाराष्ट्र गुलामीच्या अंधकारात खिचपत पडला! पुढील इतिहास थोडाफार आजही माहिती आहे! स्वराज्यसूर्य शिवरायांच्या आगमनाने महाराष्ट्राने जुने कापडे फेकावीत तशी गुलामीच्या साखळदंड फेकले अन त्रिखंडावर अधिपत्य गाजवणाऱ्या मुघलांच्या सत्तेला सुरुंग लावला.
शिवरायांच्या गमनानंतर दख्खन काबीज करण्याच्या हेतूने मुघल बादशहा औरंगजेब स्वतःला पाच लाखांच्या अन मोठ्या खजिन्यासह महाराष्ट्रात तळ ठोकला. दगाफ़टक्यामुळे महाराष्ट्राचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज त्याच्या तावडीत सापडले! मुघलांना साजेल अशी क्रूर अन निर्घृण हत्या त्याने करवली!
त्यानंतर न राजा न राजधानी पण महाराष्ट्राचे मराठा वाघ अतिविराट अशा शत्रूशी झुंज देत होते! पुढे बोलण्याआधी एक गोष्ट सांगतो. जो बोलायचा राहून गेला. प्राचीन रघुकुल नावाच्या संस्कृत ग्रंथात नमूद केल्यानुसार असा योद्धा जो दहा हजार योध्यांशी लढू शकतो असा मराठा! अशा मराठ्यांचे राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र!!
मराठा या शब्दाचे संस्कृत रुप महाराष्ट्र आहे अर्थात ज्यांचे राष्ट्र मोठे आहे ते मराठे. मरहट्टा, महारठ्ठा,रठ्ठा म्हणजे राष्ट्र,रठ्ठा मार देणे,महारथ, महारथी म्हणजे मराठा उर्फ राष्ट्रपती या संज्ञा प्राचीनकाळी अत्यन्त शौर्यशाली रणधुरन्धर क्षत्रिय राजबिण्ड्या पुरुषांनाच लावीत असत. याला आधार रघुवंशाच्या ६व्या सर्गामधील पुढील श्लोक आहे-
“‘एको दस सहस्राणि योधयेद्यस्तु धान्विनाम। शस्त्रशास्त्रप्रवीणश्च स वै प्रोक्तो महारथ:। अमितान्योधयेद्यस्तु संप्रोक्तोऽतिरथस्तु स:। रथस्त्वेकेन योद्धा स्यात्तन्न्यूनोऽर्द्धरथ: स्मृत:।’ !!
भावार्थ – शस्त्रशास्त्रात म्हणजे रणविद्येत प्रवीण होऊन जो एकथा क्षत्रिय दहा हजार योद्ध्यांबरोबर लढू शकतो त्या रणधुरन्धरासच मरहट्टा- महारथ महारथी म्हणतात.”
२७ वर्षे अखंड युद्धानंतर मुघलांच्या पाच लाखांची सेना कापली तर गेलीच पण सातत्याने होणाऱ्या मराठ्यांच्या हल्ल्याने मुघल बादशाह हैराण झाला व गतप्राण झाला! अन तिथून महाराष्ट्राने मागे पाहिले नाही! अगदी दिल्ली अन पुढं आताचा पाकिस्तानही ताब्यात घेत महाराष्ट्राने देशातील परकीय शक्तींना नष्ट केले! दिल्लीचा बादशहा नामधारी बनला! महाराष्ट्राच्या वाघांनी अफगाणीस्थाच्या सीमेवर गुरगुरायला सुरवात केलेली. दुवा: https://en.wikipedia.org/wiki/Maratha_Empire
मराठेशाही
लक्षात घ्या! शिवरायांच्या युद्धनीतीमुळे ब्रिटीश व युरोपियन सत्ता मराठेशाहीत खिळखिळ्याच नव्हे तर जमही बसवू शकल्या नव्हत्या. पुढे आपल्याच उत्तर भारताने घात केला अन पाठ दाखवून पळून गेलेला अब्दाली पानिपतात भारी पडला! तीन आठवड्यांच्या उपासमारीने महाराष्ट्राचे वाघ पानिपतात तहानभुकेने चक्कर येऊन कोसळत होते!
जगातील सर्वात भीषण लढायांमधील ती एक भीषण लढाईत अफगाणी अब्दाली शिल्लक राहिला ह्यायोगे विजयी ठरला! शेकडो मराठी स्त्रिया व मुले गुलाम बनवल्या गेल्या. त्यातील बहुतांश व्यक्ती पुढे शिखांनी अब्दालीकडून सोडवून घेतल्या. परंतु, त्या युद्धानंतर महाराष्ट्राची अख्खी तरुणाई कामी आली! अन ह्या देशाचा वाघ कमकुवत झाला!
त्याचाच फायदा घेऊन ब्रिटिशांनी मराठ्यांशी चाळीस वर्षे झुंजून देश ताब्यात घेतला! लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की महाराष्ट्र बलदंड होता तर परकीय पाय ठेऊ शकत नव्हता! उत्तर भारतीयांच्या गद्दारीने देश दीडशे तर महाराष्ट्र शंभर वर्षांसाठी गुलामीत गेला.
मग माझ्या मराठी वाघांनो, तुम्ही ठरवूनही सामान्य राहू शकत नाही! चारशे मावळ्यानिशी उभा कडा चढणारा अन दोन हजाराच्या सेनेला पराभूत करणारा नरवीर तान्हाजी मालुसरे असो वा अख्ख्या सेनेला खिंडीत गाठणारा स्वयं यमराज झालेला बाजीप्रभू देशपांडे असो! वा शत्रूला युद्धाची दाणादाण उडवणारे संताजी धनाजी असोत! हे वाघ ह्या महाराष्ट्राच्या मातीत जन्मले!
हा इतिहास आहे महाराष्ट्राचा! सोनं पिकवणारी जमीन अन पहाडाच्या छातीची माणसं ही ह्या महाराष्ट्राची ओळख! आता लक्षात आलं असेलच का हा इतिहास शाळेत शिकवत नाहीत! महाराष्ट्राचा इतिहास चे बाळकडू घेणारा कारकून म्हणून नव्हे तर वाघ बनून बाहेर पडेल!!
अनेकांना मराठीचा आग्रह हा राजकारण वा भावनिक आहे असा मोठ्ठा गैरसमज आहे. अन हा गैरसमज बहुतांश मराठी भाषिकांमध्ये आहे! त्यांच्यासाठी हा लेखप्रपंच!
खरं तर हा कुणाला दोष द्यावा असा विषय नाही. आम्हाला शाळेत शिक्षकांनी हिंदी राष्ट्रभाषा आहे असं खोटं बिंबवलं! न आम्हाला दक्षिणाधिपती सातवाहन माहिती न शिवरायांनी पन्नास वर्षात उभे केलेले ३५०+ दुर्ग/किल्ले उभे केले हे माहिती! मग ज्यांना आपण कोण हेच माहित नाही त्यांना मराठी विषयी ममत्व असण्याची आशा बाळगले हे चूकच आहे!
तर वस्तुस्थितीवर बोलूयात! मराठी भाषा महाराष्ट्र राज्याची अधिकृत भाषा असून ती देशातील तिसरी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. जगातील सहा हजार भाषांपैकी सर्वाधिक भाषा बोलण्याच्या यादीत दहाव्या क्रमांकावर ती येते.
आता कायद्याची वस्तुस्थिती काय आहे ते समजून घेऊ. भारत हे एक संघराज्य आहे. राष्ट्र या युरोपियन संकल्पनेप्रमाणे नसून अमेरिकन पद्धतीच्या संघराज्यीय व्यवस्था आहे. खचितच प्रत्येक राज्याला बरेच अधिकार आहेत! समानता असावी हा त्यामागील हेतू!
प्रत्येक राज्याच्या भाषेला राज्यघटनेनुसार भारतीय भाषा असण्याचा बहुमान प्राप्त आहे. आता आपल्या देशात ७८० भाषा स्वातंत्र्यावेळी होत्या. आता त्यापैकी २२०च्या भाषा स्वर्गवासी झाल्या आहेत. त्यावर नंतर कधीतरी सविस्तर चर्चा करू! मुद्दा इतकाच ह्या भारताला २२ प्रमुख भाषेचा दर्जा आहे. यात मराठी येते!
घटनेने २२ भाषांना प्रमुख भाषा देतांना भेदभाव केलेला नाही. आता तुम्ही म्हणाल, हिंदी राष्ट्रभाषा आहे वगैरे.. तर बाळांनो, देशातील सर्वात मोठा ४२० चा गुन्हा त्यांच्यावर दाखल होऊ शकतो जो हे पसरवतो की, हिंदी ही राष्ट्रभाषा आहे. त्यामुळे, त्याची वस्तुस्थिती अशी आहे की आपल्या देशाला राष्ट्रभाषेचा घटनेत कुठेही उल्लेख नाही. केंद्र सरकारला त्याच्या आस्थापनांच्या अंतर्गत कार्यासाठी इंग्रजी व हिंदी भाषा वापरण्याची मुभा आहे. परंतु, याचा अर्थ ती अधिकृत किंवा राष्ट्रभाषा आहे असा होत नाही.
हिंदी अतिरेक्यांनी (अतिरेकीच शब्द योग्य आहे!) हिंदी राष्ट्रभाषा करावी म्हणून प्रयत्न केला. परंतु विरोधातील मतांच्या अधिक संख्येमुळे तिचा पराभव झाला. अन मग अतिरेक्यांनी हिंदी भाषेचं खुळ राज्यघटनेत नमूद करवून केंद्राच्या पैशाने भाषा वाढवण्याचा प्रयत्न करविला! आता आलं लक्षात हिंदी अतिरेकी का म्हणालो ते?
आता मूळ विषयाकडे येवूयात! प्रत्येक राज्याची स्थापना ही भाषिकांच्या व भाषेच्या आधारावर झालेली आहे. ते करत असतांना अनेक अक्षम्य चुका झालेल्या आहे! त्या सुधारणे आवश्यक आहे! पण भाषावार प्रांतरचना करण्यामागील हेतू भाषिक स्वातंत्र्य असावे असा होता!
महाराष्ट्र अधिनियम क्र.५ (महाराष्ट्र राजभाषा अधिनियम, १९६४) अन्वये मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा प्राप्त झाला व तिची लिपी देवनागरी लिपी असल्याचे जाहीर करण्यात आले.
मग जर हिंदीसाठी १० राज्ये अन १ केंद्र सरकार मिळालेले आहेत. मग मराठीसाठी फक्त एकुलता एक महाराष्ट्र आहे. अन कायद्यानुसार तिचा अनिवार्य वापर करणे शासनास बाध्य आहे तर महाराष्ट्रात मराठीचा आग्रह हा देशद्रोह नसून शुद्ध देशभक्ती आहे. याउलट मराठी नाकारणारे कायद्यानुसार देशद्रोही ठरतात!
महत्वाचे काय? आपण कुठे चाललो आहोत ह्याच भान राहिलेलं नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. फालतू नगरसेवकाच्या पोटनिवडणुकीत मुर्दे पाडले जातात. गुन्हेगार चक्क राज्यातील आमदार! गुन्हेगारांना पोलीस चौक्यातून सहीसलामत सुटका करणारे देखील राज्याचे आमदार! पाणी पडल्याच्या कारणावरून खून आणि अनधिकृत नळजोडणी मनपाने तोडली म्हणून दंगल केली जाते. (more…)
महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा. उशिरा देतोय. त्याबद्दल क्षमस्व. आपला महाराष्ट्र खरच सुंदर आहे. अनेक गोष्टी अशा आहेत. ज्याने हा महाराष्ट्र अगदी मढला आहे. डोंगर, नद्या आहाहा. क्वचित एखाद्या भूप्रदेशाला असे लावण्य लाभले असेल. इथली लोक देखील तशीच. आणि स्वभावाने अगदी मधुर. कधीकधी याच गोष्टींमुळे महाराष्ट्र बाकीच्या लोकांच्या डोळ्यात खुपतोय असे वाटते. सतत काही न काही चालूच. (more…)
काही बोलण्याआधी मी माझ्या सर्व मित्रांचा आणि नातेवाईकांचे आभार मानतो. की ज्यांनी ‘अखंड महाराष्ट्र’ला मतदान केले. मला या गोष्टीचा आनंद आहे, की मराठी आणि महाराष्ट्र एक ठेवण्याची भावना अजूनही प्रत्येकाच्या मनात आहे. माझ्या प्रिय भाजीपाला उर्फ भाजप याला सांगतांना मला आनंद होतो आहे की, मी भाजपचे पंधरा मते, म्हणजे ज्यांनी लोकसभेला किंवा त्याआधीही कायम भाजपला मतदान करत आले. ती मते आजच्या मतदानामध्ये त्यांच्या विरोधात गेली.
खर तर खूप वेळापासून सुरवात करायचा प्रयत्न करतोय. पण हवी तशी सुरवात अजूनही होत नाही आहे. बऱ्याच दिवसांनी तोंड दाखवतोय, त्याबद्दल क्षमस्व. खर बोलायचे ठरलं तर माझ्या या दोन कन्या रत्नांसोबत कसा वेळ जातो. कळतच नाही.
जय महाराष्ट्र! आज मी या ब्लॉग मधील शेवटची नोंद ‘खरडतो’ आहे. मला समजून घ्याल अशी अपेक्षा करतो. ब्लॉग ‘मी’ विषया भोवती फिरत होता. मुळात ‘मी’ हाच एक विषय होता. प्रत्येक वेळी ‘मी’ विषय माझ्याबद्दल होता. माझ्या प्रत्येक गोष्टी माझ्या पुरत्याच होत्या. थोडक्यात, एकटाच ‘ओनर’ होतो. परंतु, आता ‘भागीदारी’ झाली आहे. ‘मी’ चे पन्नास टक्के शेअर परवा मी एका व्यक्तीला दिले आहेत. त्यामुळे आता ‘मी’ माझा राहिलेलो नाही. थोडक्यात स्टेटस ‘सिंगल’चे ‘एंगेज्ड’ झाले आहे. त्यामुळे आता इथेच थांबणे योग्य राहील. (more…)
ठिकाण विधानसभा. वार बुधवार. मागील बाकावर बसलेला एक आमदार दुसऱ्या आमदाराच्या कानात कुजबुजत ‘औ भौ, कसला गोंधळ चालू आहे?’. दुसरा आमदार, जाड मिशा आणि ओठांचा चंबू करीत ‘आव जरा गप बसा, शाहेब अर्थसंकल्प वाचून दाखवत आहेत’. पहिला आमदार समजल्याची मुद्रा करून मान डोलवत शांत बसतो. न राहून थोड्या वेळाने ‘सत्यनारायणाची पूजा चालू हाये शहेबांची..’. दुसरा आमदार डोळे मोठे आणि तोंडावर बोट ठेवत शांत राहण्याची सूचना केली. विधानसभेच्या मध्यवर्ती भागात विरोधकांची ‘नही चलेगी, नही चलेगी, दादागिरी नही चलेगी’ घोषणाबाजी सुरु असते. (more…)