प्रत्येक वेळेस, प्रत्येक ठिकाणी तो ‘का?’ येतो. सकाळी उठून वर्तमानपत्र उघडतो. बातम्या वाचू लागताच तो डोकावू लागतो. आवरून देवळात जातो. देवासमोर नतमस्तक होतो. थोड्याच वेळात दर्शनावरून मनात गोंधळ होतो. देवाच्या दर्शनाचा उद्येशाने आलेलो. पण दर्शन घेतले त्या ‘दानपेटीचे’. देवळात देवासमोरच दानपेटी कशासाठी म्हणत तो येतो. या विचाराने मन खजील होते. (more…)
टॅग: सकाळी
यंदाच कर्तव्य आहे..
माझा ना आज काम करायचा बिलकुल मूड नाही. काय मस्त विकेंड गेला आहे म्हणून सांगू! असो, फार पिळत नाही. माझ्या लग्नाची तारीख फिक्स झाली आहे. वीस मे. गेल्या शनिवारी ‘बोलणी’चा कार्यक्रम होता. माझे आई वडील, मावशी, काका आणि आमचे बंधुराज हजर होते. ती, तिचे काका, मामा, आई वडील जवळपास सर्व नातेवाईक आलेले तिचे. मस्त एकदम. सुरवातीला साखरपुड्याची तारीख ठरलेली. म्हणजे १४ मे ला साखरपुडा आणि काहीतरी २ जूनच्या आसपास लग्नाची तारीख ठरवलेल. पण नातेवाईकांना डबल चक्कर होणार, म्हणून दोन्ही कार्यक्रम एकत्रच करूयात अस सगळ्यांच मत पडलं. मग २० मे ही तारीख सर्वांनुमते ठरली. (more…)
हे काय आहे?
हे काय आहे? आज सकाळी सकाळी डोळे उघडले तर, ‘अआई’ माझ्याकडे पाहून ती तिच्या ठरलेल्या स्टाईलमध्ये, म्हणजे मान उजव्या बाजूला झुकवून हसत होती. एकदम मस्त! विसरला नाहीत ना! ‘अआई’ला? खूप दिवसानंतर आज एकदम मस्त वाटत होत. नंतर पुन्हा डुलकी लागलेली. म्हणजे धड झोपेतही नाही आणि जागा आहे असही नाही. मला माझ्या आईच्या आणि तिच्या गप्पा ऐकू येत होत्या. मागील महिन्यात वडिलांनी मला एक ‘टी-पॉय’ घेऊन दिलेला. तो ‘टी-पॉय’ स्टीलचा आहे. आणि वरच्या बाजूला एक जाड काच. तो मी बाहेरच्या खोलीत ठेवला आहे, त्यावर माझी मी बीसीएची आणि माझ्या कोर्सच्या वेळी मिळालेली पुस्तके ठेवलेली आहे. म्हटलं कोणी घरी आल्यावर तेवढंच आपल इम्प्रेशन! (more…)