टॅग: समानार्थी

‘मी’ आणि ‘ढ’ हे समानार्थी शब्द आहेत. शैक्षणिक आयुष्यात ‘ढ’ हीच एकमेव पदवी मिळाली. समस्त आठल्ये घराण्यात मी सोडून, बाकी सगळीकडे हुशारीचा सुकाळ आहे. माझी बहीणाबाई, शालेय जीवनात चुकूनही ऐंशी टक्यांच्या खाली आली नाही. बी.इ ला स्कॉलरशीप मिळवली. एम.इ नंतर आता पीएचडी करती आहे. माझे बंधुराज त्यांच्या शालेय जीवनात नवद्दीच्या घरात. पहिला क्रमांक त्याच्यासाठी कायमचं ‘राखीव’. माझी लहान बहिण चित्रकलेत पारंगत तर आहेच. पण अभ्यासात देखील सत्तरी नेहमीची. माझा लहान भाऊ एकपाठी. कला त्याच्या अंगातच आहे. तोही सत्तरीच्या खाली कधी अजून आलेला नाही. (more…)