टॅग: स्वभाव

धीर धर रे मना

धीर, धैर्य ही खूप मोठी गोष्ट आहे. आता हे सांगण्यासाठी मला साधारण तीन वर्षे घालवावी लागली. खरं तर माझा मूळ स्वभाव चंचल! एखाद्या खुशाल चेंडूप्रमाणे जीवन चाललेले! कशाची फिकीर नाही. कोणतीही अडचण नाही. शालेय जीवनात साधारण विद्यार्थी ते आजचा एक धडपडणारा उद्योजक! पण जस जसे धैर्य वाढत गेले. तसं तसे त्याचे महत्वही उमजत गेले.  (more…)

स्वभाव

स्वभाव ही खुपंच मजेदार गोष्ट आहे. तो प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. म्हणजे नेमक काय हे सांगता येणार नाही.आपले वागणे

स्वतःचे निरीक्षण करून पहा. मी जसा घरी असतांना वागतो. तसा बाहेर किंवा इतर ठिकाणी वागत नाही. सर्वांचेच जवळपास असेच असते.

माझा एक मित्र आहे. त्याला राग आल्यावर तो समोरच्या व्यक्तीला मनाला टोचेल असे बोलतो. आता त्याच्या घरी देखील तो तसाच आणि बाहेरही तसाच.

काल मैत्रिणीला दिलेला पेन ड्राईव्ह आणायला गेलो होतो. निघतांना काकूंना, फराळाला या अस म्हटलं. लगेच माझी मैत्रीण ‘फक्त काकूच का?’ अस म्हणाली. मैत्रिणी बद्दल काय बोलावं? प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेते.

माझा स्वभावाबद्दल थोडक्यात बोलायचे झाले तर, ‘जशास डबल तसे’ असा आहे. आता नेमक कसं सांगू? माझा पीएम यावर नीट बोलू शकेल.

अप्सरा खुपंच रागीट आहे. राग नाकावर असतो. प्रत्येक जण जितका प्रेमळ तितकाच रागीट असतो. जितका चांगला तितकाच वाईट देखील.

आपण आपल्यातील वाईट रूप लपवून ठेवतो. आईचा स्वभावात सडेतोडपणा! जे आहे ते तोंडावर सांगणे. माझे वडील काही बोलत नाही. आपल्या कृतीतून दाखवतात. त्यामुळे प्रत्येकाचा स्वभावाच विशेष आहे.

स्वभाव बदलणे खुपंच अवघड आहे. थोडक्यात आपण स्वतःला नवीन रूप दिल्याप्रमाणे असते. गांधीजींनी गोळी खाल्ल्यावर ‘हे राम’ म्हटले. कदाचित राहुल बाबा ‘हे मॉम’ म्हणेल.

जसे आपण असतो तसे दिसतो. काही व्यक्ती पाहिल्यावर आपल्याला नकोसे वाटते. तर काही ‘लव्ह एट फस्ट साईट’.

प्रत्येकाच्या स्वभावावर ते अवलंबून असते. स्वभावसारखे असतील तर मैत्री होते. काहींचा स्वभावच मनमिळावू असतो. त्यांचा मित्रपरिवार बनतो. काहीजण एकलकोंडे.

शेवटी सगळंच स्वभावावर अवलंबून असते. म्हणजे जर बुशचा स्वभाव आपल्या मनमोहनसिंग सारखा असता तर.. अमेरिकेत अजून दहावीस इमारतीवर विमाने येऊन धडकली असती.

वातावरण आणि परिस्थिती यावर स्वभाव बनतो. काहींना घराचा सहवास कमी मिळाला तर त्यांना ‘घराबद्दल ओढ’ निर्माण होते. काहींचे अगदी उलटे.

थोडक्यात, मला फक्त अस म्हणायचे आहे की स्वभाव आपल्याला सुधारू अथवा बिघडून टाकू शकते.

राशी आणि स्वभाव

माणसावरून राशी की राशीवरून माणसाचा स्वभाव. हा प्रश्न, अंडे आधी की कोंबडी असा आहे. माझा एक मित्र आहे. सध्याला नगरला असतो. आम्ही नगरला असतांना सोबत संगणकाचा कोर्स केला. तेव्हापासून त्याला पाहतो. त्याचा स्वभाव अगदीच रुष्ट. एकदा काय झालं, क्लासमध्ये तो एका स्टुलावर बसून संगणकावर काम करत होता. आमच्या शिक्षिकेने त्याला बघून म्हणाल्या की खुर्ची घेऊन बस. तीन तास त्या स्टुलावर बसून तुझी पाठ दुखेल. पण हा काय ऐकतोय. तिने ह्याला प्रेमात, रागात सगळ्या भाषेत त्याला सांगितले. पण त्याने नाही म्हणजे नाहीच. शेवटी ती शिक्षिका वैतागून निघून गेली. आमचा मस्त टाईमपास झाला. पण त्याचा स्वभाव अजूनही असाच आहे. माझी इथली लहान बहिण. एकदा तिला माझ्या काकूने घर झाडायला सांगितलं. ती नाही म्हणाली. झालं काकूने रागावून देखील फायदा झाला नाही. माझी बहिण अशीच आहे. दोघांची म्हणजे त्या माझ्या मित्राची आणि माझ्या लहान बहिणीची ‘धनु’रास आहे. (more…)