हे क्षण

हे क्षण! काय बोलू अस झालं आहे. नुसतेच रोमांच सगळया शरीरभर उठत आहे. नुसते क्षण आठवून ही अवस्था आहे. प्रत्यक्ष असेल त्यावेळी! ऑफरसाठी एका कंपनीने फोन केला होता. म्हणजे थोडा जॉईनिंग डेटचा घोळ चालू आहे. काळजी नसावी दोन एक दिवसात त्याचा निकाल लागून जाईल. पण आता का कुणास ठाऊक तिची इतकी ओढ वाढली आहे ना! कालचा दिवस तिने इतका छान केला ना. तिचे ते इमेल. काय कळेनासे झाले आहे, ज्यावेळी ज्याची गरज असते ते तिला कळून जाते. गेले काही दिवसांपासून मी खुपच बैचेन झालो होतो. काल सकाळी सगळंच संपले अस वाटू लागलेलं. खुपंच मूड गेलेला. तीचा ते तीन इमेल आले. आणि सगळ् बदललं.

मस्त आहेत. मुळात ती मस्त आहे. त्यानंतर, एका कंपनीचा फोन. त्यानंतर त्या एका कंपनीचा ऑफरचा फोन. तासाभरात सगळ् बदलून गेल. मला पंधरा दिवसाचा नोटीस पिरेड देत आहेत. जमू शकते. पण आता तिला सोडून जावे अस मुळीच वाटत नाही. पण इथे मी कंत्राटी पेक्षा तिथे परमनंट होईल. म्हणून त्या एच आर ‘ताई’ला एक महिना लागेल म्हणून कळवले आहे. पाहुयात काय बोलते ती ‘ताई’. ते महत्वाचे नाही. अप्सराला आता मी सांगून टाकायला उतावीळ झालो आहे. मला माहिती आहे की, हे एक ‘हरलेले युद्ध’ आहे. उत्तर माहिती आहे. पण तरीही ती मला मनापासून आवडते. काय जादू आहे ती. तिचे डोळे, तिच्याशिवाय कोणीच आपले वाटत नाही. तिचीच आठवण. सगळ् स्वप्नवत. ती आली आणि सगळंच बदलून गेल. अचानक सगळ् सुंदर झालं. तिला अगदी पहिल्यांदा पहिले त्यावेळी ती आहे की स्वप्न हेच कळत नव्हते. ती माझ्या डेस्कच्या बाजूने जातांना तिची अनुभूती.

प्रेम खरंच खूप छान असते. कधी हिमालयाच्या उंच शिखरावर असल्याप्रमाणे वाटते, तर कधी समुद्राच्या तळाशी. बस प्रत्येकवेळी तिचाच ध्यास. हे घडतं किंवा कसं होते याचा मात्र शोध लागत नाही. म्हणजे अचानक अगदी स्वप्न सत्यात घडावं. मी काय बडबडतो आहे. अजून थोडे दिवस. मग नाही. तिला सांगितल्यावर कदाचित ती मला ‘आकाशातून’ जमिनीवर आणेल. पण हरकत नाही. तीचे असणे, तिचे माझ्याशी बोलणे हे माझ्यासाठी स्वर्गीय अनुभव आहेत. आयुष्यभर मी ते जपून ठेवील. ती इतकी सुंदर आहे ना! आणि ते पाणीदार डोळे, तिची नजर.. नाहीत माझ्याकडे काही शब्द. तिचे ते केस, तिचे हसणे, तिचे बोलणे! अहाहा. बस आता महिनाभर सगळ् डोळ्यात साठवून ठेवत आहे. पुन्हा ती कधी भेटेल देव जाणे. जबरदस्त दिवस होते सर्व.

ती एकदाचं, एकदाचं का असेना ती माझ्या डेस्कवर आलेली माझ्याशी स्वतःहून बोललेली. त्या सुंदर स्वप्नाचे बोलणे. कोणीतरी मला गुदुगल्या करीत आहे. तिथेच नाचावं अस वाटत होते. ती बोलतांना, कानात मध ओतत असल्याप्रमाणे! ती हसतांना, आहाहा! काय क्षण असतात. आणि ती ज्यावेळी समोरून जात असते त्यावेळी अंगावर उठणारे रोमांच. अगदी पावसात भिजल्याचा आनंद. अतिशयोक्ती काहीच नाही. मी खरंच अनुभवतो आहे. मलाही अजून हे स्वप्न असल्याचे भासते आहे. हाच एक विषय ज्यावर मी कधीही आणि कितीही वेळ न थकता बोलू शकतो. मन इतकं वाहून कसं गेल? अजूनही आठवलं की हसू येत. हे क्षण कधीही न विसरू शकणारे. तीचा नकार असेल तरी मी दु:खी होणार नाही. आणि ना ते हिमेशची गाणी ऐकेल. आणि ना ‘बेवडा हीरो’ बनेल. आणि ना पुन्हा याविषयावर बोलेल. अर्थहीन आयुष्य तीच्या असण्याने अर्थपूर्ण झाले. तेच रोज रटाळ जीवन अगदी हजार किमीच्या वेगाने धावू लागले.

असो, तीची भक्तीची ही देणगी आहे. अजून मला काय हवं आहे. पण हेही खर की हे स्वप्न माझ्यासाठी आहे. माझ्यासाठीच आणि फक्त माझ्यासाठीच ‘स्वप्न’ सत्य व्हावे अस खूप वाटते. मनातून हीच इच्छा आहे. पण वस्तुस्थितीची जाणीव आहे. हे सोन्याचे दिवस मी जपून ठेवील. हे क्षण अनमोल क्षण आहे.

Leave a Reply